Created by saudagar, 08 October 2024
Employees breaking news :- नमस्कार मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे समोर येत आहे .खासगी क्षेत्रातील कर्मच्याऱ्यांसाठी महत्तवाची बातमी आहे.पुढील वर्षी, भारतात 9.5 टक्क्यांपर्यंत पगार वाढ होऊ शकतो, जी 2024 मध्ये 9.3 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जागतिक व्यावसायिक सेवा फर्म Aon PLC च्या 30 व्या वार्षिक वेतन वाढ आणि व्यापार सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.जुलै आणि ऑगस्टमधील 40 उद्योगांमधील 1,176 कंपन्यांच्या डेटाचे विश्लेषण करून हा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यात आला आहे.
employes today news
कोणत्या क्षेत्रातील पगार किती वाढणार?
कर्मच्याऱ्यांचा पगार पुढील वर्षात 9 % पेक्षा जास्त वाढू शकतो .पुढील वर्षी उत्पादन आणि किरकोळ क्षेत्रात 10 टक्के आणि वित्तीय कंपन्यांमध्ये 9.9 टक्के वाढ होऊ शकते.
ग्लोबल कॉम्पिटन्स सेंटर आणि टेक्नॉलॉजी प्रॉडक्ट्स आणि प्लॅटफॉर्मच्या कर्मचाऱ्यांना अनुक्रमे 9.9 टक्के आणि 9.3 टक्के पगारवाढ मिळण्याची अपेक्षा आहे. याशिवाय तंत्रज्ञान समुपदेशन आणि सेवा क्षेत्रातील वेतन 8.1 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
एट्रिशन रेट कमी होईल
या अहवालानुसार पुढील वर्षी एट्रिशन रेट कमी होईल. हा दर 2022 मध्ये 21.4 टक्के, 2023 मध्ये 18.7 टक्के आणि आता 2024 मध्ये 16.9 टक्के अपेक्षित आहे. या अभ्यासाचा दुसरा टप्पा 2025 च्या सुरुवातीला प्रकाशित केला जाईल. यामध्ये डिसेंबर आणि जानेवारीमध्ये गोळा केलेल्या डेटाचा समावेश असेल.
मोठी अर्थव्यस्था त्यामुळे महागाई जास्त
भारतातील पगारवाढीचे कारण वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये जीडीपी वाढीचा दर 8.2 टक्के होता. 2024-25 या आर्थिक वर्षात ते 7.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्मच्याऱ्यांचा पगार वाढेल
यामध्ये अभियांत्रिकी, उत्पादन आणि किरकोळ उद्योगांमधील पगार 10 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे आणि वित्तीय संस्थांमधील पगारात 9.9 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे, हे चांगले लक्षण मानले जात आहे.