EPFO कर्मच्याऱ्यांसाठी आनंदाची बातमी – PF खात्यात व्याजाचे पैसे येऊ लागले,जाणून घ्या अपडेट. Epfo today update

Created by saudagar, 28 September 2024

Epfo today update :- नमस्कार मित्रांनो आज आपण EPFO कर्मच्याऱ्यांसाठीमहत्तवाची माहिती घेऊन आलो आहोत.करोडो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केली मोठी घोषणा. मंत्रालयाने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यास मान्यता दिली आहे.EPFO NEWS

पीएफ खात्यात व्याजाचे पैसे येऊ लागले.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आर्थिक वर्ष 2023-24 साठी व्याजदर 8.25 टक्के वाढवण्याची घोषणा केली होती, ज्याला आता वित्त मंत्रालयाने मान्यता दिली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2023-24 साठी नवीन व्याजदर गेल्या वर्षीच्या 8.15% व्याजदरावरून 8.25% पर्यंत वाढवला आहे. Epfo update

ईपीएफओने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती देताना सांगितले EPF सदस्यांना आर्थिक वर्ष 2023-24 साठी 8.25% व्याज मिळेल. नवीन दर मे 2024 मध्ये अधिसूचित करण्यात आले होते. आता कर्मचारी केवळ त्यांच्या पीएफ खात्यात व्याज जमा होण्याची वाट पाहत आहेत. Epfo news 

भविष्य निर्वाह निधी – विभागाने माहिती दिली

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर वर पोस्ट केले की EPF सदस्यांसाठी व्याज दर त्रे मासिक घोषित केले जात नाही. साधारणपणे, वार्षिक व्याजदर आर्थिक वर्ष संपल्यानंतर पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या त्रे मासिक जाहीर केला जातो. त्यामुळे, EPF सदस्यांसाठी आर्थिक वर्ष 2023-24 साठी 8.25% व्याजदराला भारत सरकारने आधीच मान्यता दिली आहे.

ज्याला EPFO ​​ने 31-05-2024 रोजी अधिसूचित केले आहे. 23,04,516 दावे निकाली काढण्यात आले आहेत. ज्यामध्ये 9260,40,35,488 रुपयांची रक्कम सभासदांना 8.25% वार्षिक व्याजदरासह वितरीत करण्यात आली आहे. Epfo update today 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना – तुम्ही हे कसे तपासू शकता

अधिकृत उमंग ॲपला भेट द्या, लॉग इन करा आणि तुमच्या मोबाइल डिव्हाइसवर तुमच्या EPF पासबुकमध्ये प्रवेश करा.

सदस्य पासबुक” वर क्लिक करा. लॉग इन करण्यासाठी तुमचा UAN, पासवर्ड आणि कॅप्चा वापरा. तुमचे पासबुक नोंदणीच्या 6 तासांच्या आत दिसून येईल. Epfo update 

Leave a Comment